अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
नाशिक : भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे.या उपचार पद्धतीला शासकीय आरोग्य यंत्रणतेच दुय्यम समजले गेले तर त्याचा विपरीत परिणाम समाजात होऊ शकतो. त्यामुळे शासकीय पातळीवरच या पॅथींना राजमान्यता मिळायला हवी. सर्वसामान्यांना या पॅथींना जोडणाऱ्या योजनांचीही गरज आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी यासाठी मोठी तरतूद करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली़आयुर्वेदाची ओपीडी असावी बंधनकारकरत सरकारने सुरू केलेल्या आयुषमान भारत संकल्पनेंतर्गत शासकीय यंत्रणेत आयुर्वेद उपचार पद्धतीचा समावेश कायद्याने करणे अपेक्षित आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही केली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुर्वेद ओपीडी करावी, आयुर्वेदाच्या प्रचारासाठीचे धोरण असावे, औषधे वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान आणि प्रोत्साहन देण्याची योजना आखावी.- डॉ. ज्ञानेश्वर थोरात, कार्यकारी समिती सदस्य,सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडीसिन, नाशिक आयुर्वेद संघटनाहोमिओपॅथीचे स्वतंत्र मंत्रालय असावेरंपरिक उपचार पद्धतीतील अत्यंत गुणकारी चिकित्सा पद्धती असून, होमिओपॅथीसाठी स्वतंत्र संचालनालय असेल तर होमिओपॅथी सर्वसामान्यांपर्यंत पोहचू शकेल. होमिअोपॅथी डॉक्टरांची नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हावी. जिल्हा रुग्णालयातही २५ बेड राखीव असावेत. मनपातही होमिओपॅथी डॉक्टरांची नेमणूक असावी. शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय झाले पाहिजे. - डॉ. भालचंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष,नाशिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनयुनानीच्या प्रसारासाठीचे धोरण ठरवावेनानी या अत्यंत जुन्या आणि गुणकारी उपचार पद्धतीकडे आजवर अपेक्षित असे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही उपचारपद्धती मर्यादित राहिली. युनानी पद्धत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी धोरण महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये खास तरतूद केली पाहिजे. आयुष विभागाने युनानीच्या प्रचारासाठीचे धोरण ठरवावे. लोकांपर्यंत ही उपचार पद्धती पोहोचविण्यासाठी स्वतंत्र निधी उभारावा. फक्त युनानी महाविद्यालयांपुरती उरलेले हे शास्त्र जनतेमध्ये आणले पाहिजे.- डॉ. अजहर हुसेन, एमडी युनानीहॉस्पिटल्स उभारणीसाठी सुलभ टॅक्सस्लॅब असावाप्लांट कॉस्ट कमी झाली तर आॅपरेशन्स स्वस्त होतील. हायर अॅन्टीबायोटीक औषधांच्या किमती कमी व्हाव्यात. हॉस्पिटल्स उभारताना डॉक्टरांना सर्व प्रकारचे ३८ परवाने घ्यावे लागतात. त्यात सुसुत्रता आणावी़ ही बाब लक्षात घेऊन सुलभ टॅक्सस्लॅब आणावा.- डॉ. प्रशांत भुतडा, अर्थोपेडिक सर्जन, नाशिकरोडशासकीय रुग्णालयात सुविधा वाढाव्यातसकीय आरोग्य सेवेत अद्ययावत यंत्रणा असल्यास चांगले डॉक्टर सेवा देऊ शकतील़ सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाºया डॉक्टरांसाठी चांगले निवासस्थाने असावीत़ तसेच त्यांना आकर्षक वेतनही देण्याची तरतूद व्हावी़- डॉ़ समीर पेखळे, कन्सल्टिंग फिजिशियन