सिन्नर : तालुक्यातील वावी येथे शिवजयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नवले यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र काटे व अक्षय खर्डे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील विविध मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची सावता महाराज मंदिर प्रांगणात बैठक झाली. त्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी उत्सव समितीची निवड करण्यात आली. यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी नवले तर उपाध्यक्षपदी काटे व खर्डे यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी प्रशांत काळोखे, गणेश वैराळ, अभिषेक - मयूर आनप, प्रताप काटे, भालदार-चोपदार - आशीष माळवे, संतोष भोपी तर छत्रपती शिवाजी महाराज वेषभूषा - श्रेयस माळवे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य संदीप राजेभोसले, गणेश वेलजाळी, वैभव नवले, संतोष वैराळ, नवनाथ काटे, गणेश काटे, छोटू काटे, दर्शन सोमाणी, गौरव वर्मा, योगेश ताजणे, अनिकेत काटे, सतीश वैराळ, शुभम माळवे, सतीश गायकवाड, दत्तात्रय संधान, विशाल काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी- लक्ष्मण नवले, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, वावी
===Photopath===
040221\04nsk_13_04022021_13.jpg
===Caption===
लक्ष्मण नवले