शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

लक्ष्मीपूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:21 PM

सिन्नर/ंमालेगाव : ग्रामीण भागात दिवाळी सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसून आली. सायंकाळी शहरातील सराफपेठ व विविध आस्थापनांमध्ये मुहूर्त साधून मनोभावे लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देदीपोत्सव : आतषबाजीने आसमंत उजाळला

सिन्नर/ंमालेगाव : ग्रामीण भागात दिवाळी सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसून आली. सायंकाळी शहरातील सराफपेठ व विविध आस्थापनांमध्ये मुहूर्त साधून मनोभावे लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.नोटाबंदी, जीएसटी व वाढती महागाई यावर मात करीत नोकरदार वर्गाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. परतीच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची झळ सोसून शेतकरीवर्ग सण उत्साहात साजरा करीत आहे. बुधवारी शहरातील सरस्वतीपूल, गणेशपेठ, वावीवेस, गावठा, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक आदी भागात झेंडूची फुले व पूजा साहित्य विक्रीसाठी आले होते. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची दुकाने लावली होती. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे बाजारपेठ फुलून गेली होती.विविध शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाकडे जाण्याची लगबग सुरू आहे. शहरातील व्यापाºयांनी प्रतिष्ठाने व दुकानांमध्ये झेंडूच्या फुलांचे तोरण लावून विधिवत पूजन करीत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रतिनग असा होता. लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाºया केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता.देवीच्या पूजेसाठी आसन, चुनरी, हळदकुंकू, सुपारी, नारळ, अगरबत्ती, वात, कापूर, खारीक, बत्तासे, गुलाब जल आदी सामानाच्या एकत्रित साहित्याची विक्री किमान ४० ते ३५० रुपयांना होत आहे. पणत्या व आकाशकंदिलामुळे रोषणाईचा झगमगाट जाणवत होता. फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दीपावली सण आणि झेंडूची फुले यांचे नाते अतुट आहे. या सणासाठी घरोघरी आंब्याच्या पानांमध्ये गुंफून झेंडूच्या फुलांच्या माळा व झेंडूच्या फुलांची छोटी छोटी झुडपे घरादारात मांगल्याचे प्रतीक म्हणून लावली जातात. शहरात दसरा-दिवाळी सणानिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागाव्यतिरिक्त नाशिक, नाशिकरोड, संगमनेर, कोपरगाव व शिर्डी या भागातून मोठ्या प्रमाणात फुले विक्रीस येतात. सरस्वतीपूल भाग झेंडूच्या फुलांच्या बाजारामुळे सजला होता. झेंडूच्या फुलांमध्ये कलकत्ता व गावरान हे दोन प्रमुख प्रकार आहेत. शेवंती, गुलाब व कमळाच्या फुलांना मागणी दिसून आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागणी अधिक असल्याने लोकांनी फुलांच्या खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रतिनग असा होता.लक्ष्मी म्हणून पुजल्या जाणाºया केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता.सिन्नरला एटीएम केंद्राबाहेर रांगा दिवाळीच्या खरेदीसाठी चाकरमान्यांची झुंबड उडाली असून, शहरातील एटीएम केंद्राबाहेर रांगा दिसत आहेत. बँकाना लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा अशा सलग दोन दिवस सुट्ट्या असून, शुक्रवारी (दि. ९) रोजी बॅँका सुरू राहतील. पुन्हा शनिवार व रविवारी अशा सलग सुट्ट्यांमुळे एटीएमवर ग्राहकांना व्यवहार पार पाडावे लागणार आहेत. बॅँकांना बुधवारपासून सुट्ट्या असल्याने ग्राहकांचा सर्व ताण एटीएमवर आला आहे. त्यामुळे पैसे शिल्लक असलेल्या एटीएम मशीनवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील गणेश पेठ, नाशिकवेस, शिवाजी चौक परिसर गर्दीने फुलून गेला आहे. अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे.