जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बल्हेगाव शिवारात उभारण्यात येत असलेल्या बायोगॅस सीएनजी गॅस प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारुतीराव पवार होती तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे ,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ काले ,सरपंच मीराताई कापसे उपस्थित होते. तर कार्यक्रमास देवाजी भुरु वंजारी नंदुरबार ,संतराम घेर वैजापूर, उदावंत राजेंद्र राहाता, योगेश पारधी, रणजीत दातीर यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .मीरा क्लीन फ्युएल लि. मुंबई यांच्या अंतर्गत येवला बायो फ्युएल प्रा.लि. आणि येवला फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प तालुक्यात साकारत असून शेतीमाल उत्पादित हत्ती गवत व काडीकचरा टाकाऊ मालापासून येथे सीएनजी गॅस तयार करण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी भारत सरकारची परवानगी मिळाली असून कंपनीने तालुक्यात प्रत्येक गावात एका ग्रामउद्योजकाची नेमणूक केली आहे. या ग्रामोद्योगाच्या माध्यमातून कंपनी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक मार्गदर्शन सेंद्रिय शेती करण्यासाठी खते बी-बियाणे पुरविण्यात येणार आहे. कंपनीने आतापर्यंत तालुक्यात दहा हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहेत. कंपनीचे अध्यक्ष संपतराव जाधव व सचिव दादासाहेब जाधव यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला., यावेळी श्रावण पाटील देवरे ,वाल्मीक सांगळे ,नंदू आबा सोमासे, हिरालाल घुगे, सुदाम गाडेकर, अरुण जाधव, आदीसह ग्रामउद्योजक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौसर भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रावण पाटील देवरे यांनी मानले.