नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्यानंतर आत्तापर्यंत पाच हजार व्यावसायिकांचे तपासणीअंति मूल्यांकन करण्यात आले असून आत्तापर्यंत २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या कामाचा वेग वाढावा यासाठी आता विक्रीकर खात्याच्या सेवानिवृत्त अधिकाºयांची मदत घेऊन मोठी मूल्यांकन करण्यात येणार आहे.महापालिका हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू झाल्यानंतर सुमारे २५ हजार उद्योग-व्यावसायिकांनी नोंदणी केली होती. एलबीटी संपुष्टात आल्यानंतर अशा उद्योजक व्यावसायिकांवरील हा कर संपुष्टात आला. दरम्यान, त्यांचे खाते बंद करताना राज्य शासनाने अभय योजनाही राबविली होती. दरम्यान, अशा मिळकतींचे मूल्यांकन करण्यासाठी राज्यशासनाने मार्च अखेरपर्यंतची मुदत दिली होती. त्या कालावधित महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर प्रशासनाकडे चाचपणी केली असता प्रकरणे बंद झाल्याचे सांगण्यात आले मात्र नवी मुंबईतील अधिकाºयांना बोलावून त्यांना यासंदर्भात माहिती दिली आणि शासनाच्या आदेशाप्रमाणेच मार्चअखेरीसपर्यंत एलबीटीसाठी नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना नोटिसा दिल्यानंतर तीन वर्षे मूल्यांकन करता येईल अशी तरतूद आहे. त्यामुळे त्याची पडताळणी केल्यानंतर २५ हजार व्यापारी आणि व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.या व्यापाºयांना वार्षिक विवरण मागूवन त्यांनी महापालिकेला आणि विक्रीकर खात्याला दिलेल्या विवरणपत्रांची पडताळणी केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे पाच हजार व्यावसायिकांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आली असून, त्यातून २२ कोटी रुपयांची देय रक्कम महापालिकेने वसूल केली आहे. आणखी मूल्यांकनासाठी निवृत्त विक्रीकर अधिकाºयांची मदत घेतली जाणार आहे.मोठ्या उद्योग आस्थापनांची विशेष तपासणीमहापालिकेने एका वर्षाचे विवरण केल्यानंतर मागील तीन वर्षांचेदेखील कागदपत्रे मागत असून एकूण ७६ हजार विवरण पत्रे तपासण्यात येणार आहेत. त्यातील आत्तापर्यंत केवळ पाच हजार विवरण तपासण्यात आले आहेत. मोठ्या उद्योग आस्थापनांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या वतीने विक्रीकर अधिकाºयांची मदत मिळणार आहे.मोठ्या प्रमाणात उत्पन्नवाढीची शक्यतामहापालिकेच्या वतीने तपासणी केलेल्या तपासणी मोहिमेत आत्तापर्यंत २२ कोटी रूपये मिळाले आहेत. उर्वरित मूल्यांकनातून यापेक्षा कैकपटीने अधिक वसुली होण्याची शक्यता आहे.
एलबीटी मूल्यांकनातून मिळाले २२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:28 AM
महापालिकेच्या वतीने शहरातील एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्यानंतर आत्तापर्यंत पाच हजार व्यावसायिकांचे तपासणीअंति मूल्यांकन करण्यात आले असून आत्तापर्यंत २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या कामाचा वेग वाढावा यासाठी आता विक्रीकर खात्याच्या सेवानिवृत्त अधिकाºयांची मदत घेऊन मोठी मूल्यांकन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देकार्यवाही सुरूच : निवृत्त विक्रीकर अधिकाऱ्यांची मदत घेणार