शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांची तारेवरची कसरत

By admin | Published: February 13, 2017 12:19 AM

बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांची तारेवरची कसरत

 नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी (दि.१३) माघारीची अंतिम मुदत असून, तुल्यबळ बंडखोरांबरोबरच इतर अपक्ष उमेदवारांची माघारीसाठी मनधरणी करताना राजकीय पक्षांचे उमेदवार आणि नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. समजूत घातलेले आणि माघारीसाठी तयार झालेल्या उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत जातील किंवा नाही याची धास्ती अनेकांना लागून राहिली आहे. उमेदवारी माघारीसाठी एकच दिवस ठेवण्यात आल्याने सोमवारी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक महापालिकेसाठी चार दिवस उमेदवारांनी माघार घेतली; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अर्ज माघारीची मुदत जरी ८ ते १३ फेब्रुवारी असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस देण्यात आला आहे. एकाच दिवशी माघार असल्याने सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज एकाच दिवशी मागे घेण्यात येणार असल्याने राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अपक्षांच्या तसेच बंडखोरांच्या माघारीसाठी चांगलीच धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकीय पक्षांचे नेते आणि अधिकृत उमेदवार बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करण्याबरोबरच त्यांना विविध आश्वासनेही देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. हे प्रयत्न आज माघारीनंतर सफल होतील की नाही असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. (प्रतिनिधी)