जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती.
लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.नायगावसह नऊ गाव नळपाणी पुरवठा योजनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व जलवाहिनी दुरूस्तीत हलगर्जीपणा यामुळेनागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभभरत नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जायगाव व देशवंडी येथील पाणीटंचाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे चौफुली परिसरात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला अनेक दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात गळती आहे. संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आहे. मात्र दुरूस्ती करण्यासाठी वारंवार लागणाºया पैशांवरून अधिकाºयांमध्ये तू तू मै मै होत असल्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्यास वेळ लागत आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्याचा परिणाममोह येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून इतर गावांना पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्यामुळे गळतीचे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जलवाहिनीचे काम करण्याची गरज आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.