नाशिक : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’, ‘उठा राष्टÑवीर हो’ आणि ‘भारत हमको प्यारा है’.... या राष्टÑभक्तीपर गीतांनी पंचवटीतील स्वामिनारायण मंदिराजवळील लंडन पॅलेस गुरुवारी (दि.२५) सकाळी दुमदुमले आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. झेप सांस्कृतिक मंडळ आणि तपोवन ब्रह्मचर्याश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्टÑभक्तीपर समूहगानचा उपक्रम लंडन पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आला होता. झेप संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक गुरुमित बग्गा आणि स्वामिनारायण मंदिराचे माधवस्वामी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. या उपक्रमात शहरातील २५ शाळांमधील दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संत तुकडोजी महाराजांच्या भजनासह चार राष्टÑभक्तीपर गीतांचे समूहगान केले. यावेळी, कणकबेन साकुरीकर, तेजस्वी जोशी, श्रीमती पगारे, श्रीमती कुलकर्णी, करिश्मा निकम, श्रीमती पंढरपूरकर आणि तक्षशिला सोनवणे यांनीही साथ दिली. साथसंगत ज्ञानेश्वर कासार, हरिभाऊ काशीकर व टिळे (हार्मोनियम), नवीन तांबट व नाना खरे (तबला), राजन अग्रवाल (ढोलकी) आणि सुशील केदार (आॅक्टोपॅड) यांनी केली. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, आमदार जयंत जाधव, आमदार सुधीर तांबे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी खासदार प्रतापराव वाघ, जीतूभाई ठक्कर, अनिल चौगुले, नगरसेवक सुषमा पगारे आदी उपस्थित होते.
‘झेप’चा उपक्रम : दहा हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन लंडन पॅलेसमध्ये दुमदुमले राष्ट्रगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:36 AM
नाशिक : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’, ‘उठा राष्टÑवीर हो’ आणि ‘भारत हमको प्यारा है’.... या राष्टÑभक्तीपर गीतांनी लंडन पॅलेस दुमदुमले.
ठळक मुद्देदहा हजार विद्यार्थी सहभागीराष्टÑभक्तीपर गीतांचे समूहगान