नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील आयआयटीसारख्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.नाशिकमधून ऋषभ ललवाणीने प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांमध्ये २५९ गुणांसह १९३ वी रॅँक प्राप्त केली असून, यश नेहरा याने २०२ वी रॅँक प्राप्त केली आहे. श्रीनिवास कुलकर्णी याने २५७ गुणांसह २१२ वी रँक मिळवली आहे. तर कौस्तुभ भार्गवने २३१ गुणांसह ५४१ रँक मिळवली असून, श्रेयस हवालदार २२५ गुणांसह ६५१ रँक व राज पाटीलने २२५ गुणांसह ६५८ वी रँक प्राप्त करून पहिल्या हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांमध्ये रँक मिळवून यश संपादन केले आहे. तर, ध्रुव धिंग्राने ११९४, २०२ गुण मिळविणाऱ्या यश कुलकर्णीला १४६६, अजिंक्य पवार २०७ गुणांसह १२१४, पल्लवी कोचला १८२८, मानव मेहताला २३८६,यश सारडाला ३४९९, अभिषेक पाटील ४६७७ व तेजस तिवारीने ४७४० वी रँक प्राप्त केली आहे. यावर्षी आयआयटी कानपूरतर्फे २० मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी २ लाख २४ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले असून, यात देशभरातील १६ हजार ६२ मुलांनी व २ हजार ७६ मुलींनी यश संपादन केले आहे. यात सर्वसाधारण गटातील ८ हजार ७९४, इतर मागासवर्ग प्रवर्गातील ३ हजार १४०, अनुसूचित जाती गटातून ४ हजार ७०९ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ हजार ४९५ विद्यार्थी आयआयटी व तत्सम संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. तर राखीव प्रवर्गातून ज्ञानदीप काळेने ७९ वी, ओबीसी गटातून अभिषेक पाचोरकर १७३ गुणांसह ४८३ वी, विशाल ठाकरे २१४ व भूषण मिसाळने २३४ वी रॅँक प्राप्त केली आहे. आआयटी जेईई अॅडव्हान्स परिक्षेत नाशिकच्या यश नेहरा, श्रीनिवास कुलकर्णी आणि अभिषेक पाचोरकर यांनी गणित विषयात उल्लेखनीय यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोहित सक्सेना यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जेईई अॅडव्हान्समध्ये झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:31 AM
नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार राष्ट्रीय स्तरावरील आयआयटीसारख्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
ठळक मुद्देनाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश पसंतीनुसार घेता येणार प्रवेश