इगतपुरी : आज महाविद्यालयीन तरुण व शालेय विद्यार्थी वेगळ्याच जगात वावरताना दिसतो आहे. त्याने वास्तवाचे भान ठेवून शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आर. एन. खान यांनी केले.इगतपुरीत विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. इगतपुरी तालुका विधि सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. के. सपकाळ होत्या.व्यासपीठावर वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. जितेंद्र शिंदे, सचिव अॅड. यशवंत कडू, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, शंकरडांगळे, रमेश परदेशी, आर. जी. परदेशी, सोमनाथ भुतडा, स्मिता रोकडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. रोहित उगले यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. धरती वाजे यांनी केले. आभार अॅड. डी. एस. खातळे यांनी मानले. अॅड. प्रगती सुरते यांनी कवितेच्या माध्यमातून कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो. कायद्यात त्यांनाही अनेक ठिकाणी संरक्षण देण्यात आले असून, याची माहिती व जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले.
वास्तवाचे भान ठेवून शिक्षण घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:02 PM
इगतपुरी : आज महाविद्यालयीन तरुण व शालेय विद्यार्थी वेगळ्याच जगात वावरताना दिसतो आहे. त्याने वास्तवाचे भान ठेवून शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आर. एन. खान यांनी केले.
ठळक मुद्देआर. एन. खान : इगतपुरीत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण