नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व तारखांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने आयोगाने सर्वच विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन या निवडणुकीसाठी लागणाºया कर्मचाऱ्यांना निवडणूक पूर्वप्रशिक्षण देण्याचे सक्तीचे करून प्रशिक्षणाला दांड्या मारणा-या कर्मचा-यांवर कारवाईची तयारी चालविली असली तरी, ज्यांना निवडणूकीच्या प्रशिक्षणासाठी नोटीसा बजावल्या त्यातील अनेक कर्मचारी, अधिकारी प्रशिक्षणापुर्वीच दिर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले असल्याचे तर काही कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याचेही आढळून आले आहे. अशा कर्मचारी, अधिका-यांना ‘दांडीबाज’ ठरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आताा प्रशाासन कोणावर कारवाई करेल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील चौदा मतदारसंघांतून जवळपास ३७२३ कर्मचा-यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले होते. निवडणूक कामासाठी नेमण्यात येणा-या शासकीय कर्मचा-यांची माहिती त्यांच्या कार्यालय प्रमुखांकडून घेण्यात येवून एकाच आदेशात कार्यालय प्रमुखाला एक पत्र पाठवून त्यात नेमलेल्या सर्व कर्मचा-यांची नावे टाकून त्यांना प्रशिक्षणाला हजर राहण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु त्यातील बरेचसे कर्मचारी यापुर्वीच वैद्यकीय कारणास्तव रजेवर तर काहींकडे विवाह असल्याने त्यांनी महिना, दोन महिन्यापुर्वीच रजा टाकल्या आहेत, काही कर्मचारी निवडणुकीपूर्वीच सेवानिवृत्त होणार आहेत. काही कर्मचाºयांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया, काहींकडे दुखद घटना घडलेल्या असताना अशांना प्रशिक्षणाच्या नोटीसाच मिळालेल्या ााहीत. परंतु निवडणूकपुर्व प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्या प्रशिक्षणाची माहितीच नाही, त्यांना नोटीसा मिळाल्याने कर्मचारी, अधिकाºयांमध्ये धावपळ उडाली आहे. त्यामुळे संबंध नसलेल्या प्रकरणात त्यांच्यावर खुलासा करण्याची वेळ आली आहे.
चौकट===अधिका-याची शिपायापुढे सफाईनाशिक मध्य मतदार संघात अशाच प्रकारे दोन महिने रजेवर असलेल्या एका अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या अधिका-याने आपला खुलासा व त्यापृष्ट्यर्थ पुरावे जोडून नायब तहसिलदार पठारे यांच्याकडे बाजु मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्या अधिका-याला ‘मी नायब तहसिलदार आहे, ही कामे शिपायाची आहेत’ असे सांगून कागदपत्रे पाहण्याची तसदीही घेतली नाही. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना संबंधित नायब तहसिलदार कार्यालयातील अन्य कर्मचा-यांमध्ये हास्य विनोदात दंग होत्या. अखेर कार्यालयातील शिपायापुढे अधिका-याला आपली सफाई पेश करावी लागली आहे.