शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मराठा वसतिगृहाच्या ठेक्याची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:01 AM

डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी शुक्रवारी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येऊन चालू वर्षापासून मेडीआर्ट फाउंडेशन नाशिक या संस्थेस ते चालविण्यासाठी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नाशिक : डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी शुक्रवारी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येऊन चालू वर्षापासून मेडीआर्ट फाउंडेशन नाशिक या संस्थेस ते चालविण्यासाठी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सरकारी अथवा खासगी इमारती भाडेतत्त्वावर घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरल्याने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मेरीच्या ताब्यातील दोन इमारतींची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली असून, सदरचे वसतिगृह चालविण्यासाठी शासनाने मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून स्व. रामगोपालजी कस्तुरचंदजी बूब बहुउद्देशीय संस्था, छत्रपती फाउंडेशन, पद्मतारा सामाजिक शैक्षणिक संस्था, जागृती सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास संस्था, मातोश्री जसोदाबाई सोनी विकास संस्था, जय जनार्दन सेवाभावी संस्था व मेडीआर्ट फाउंडेशन यांनी अर्ज सादर केले होते. त्यातील दोन संस्था निकषात पात्र ठरल्याने त्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात आली असता, त्यात मेडीआर्ट संस्थेची चिठ्ठी निघाली.प्रवेशप्रक्रिया राबविणारया वसतिगृहात २४० विद्यार्थ्यांची सोय करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येईल व त्यानंतर ६० मुलींसाठी सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दिल्या जाणाºया आठ हजार निर्वाहभत्त्यातून संस्थाचालकाला पैसे अदा करण्यात येणार आहेत.

टॅग्स :marathaमराठाNashikनाशिक