शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 11:11 PM

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे. त्यामुळे येथे नव्याने पंचवार्षिक ...

ठळक मुद्देसिन्नर । निवडणुकीचा बिगुल वाजल्याने तयारीला वेग

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे. त्यामुळे येथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये ३ व ४ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समिती आणि तहसीलच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि. ३ आणि ४ फेब्रुवारीदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीस विशेष ग्रामसभेच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. ३ फेब्रुवारीला ५४, तर ४ फेब्रुवारीला ४६ गावांच्या विशेष ग्रामसभा होणार आहेत. ग्रामस्थांना या विशेष ग्रामसभेची तीन ते चार दिवस अगोदर माहिती व्हावी, या उद्देशाने ग्रामसेवकांनी या आरक्षण सोडतीचे स्थळ, वेळ, दिनांक याबाबत दर्शनीय भागात प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत असल्याने पुढच्या सहा महिन्यांत तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. एकाचवेळी १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण पडणार आहे.या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुकातालुक्यातील आडवाडी, बोरखिंड, बारागावपिंप्री, भोकणी, लक्ष्मणपूर, भरतपूर (विघ्नवाडी), चंद्रपूर, खापराळे, चापडगाव, चास, दहीवाडी, महाजनपूर, दापूर, देवपूर, धोंडवीरनगर, हिवरगाव, जामगाव, जामगाव, कुंदेवाडी-मजरे, कुंदेवाडी मौजे, कनकोरी, खंबाळे, मेंढी, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, पांगरे बुद्रुक, पिंपळे, पंचाळे, कहांडळवाडी (शिवाजीनगर), सोनांबे, वावी, वडगाव-सिन्नर, हरसुले, जयप्रकाशनगर, सोनारी, धारणगाव, धुळवड, घोरवड, हिवरे, मुसळगाव, मानोरी, निमगाव-सिन्नर, पास्ते, पांगरी खुर्द, पुतळेवाडी (रामपूर), सोमठाणे, सुळेवाडी (सुंदरपूर), सावता माळी नगर, श्रीरामपूर (शिंदेवाडी), यशवंतनगर (पिंपरवाडी), निमगाव-देवपूर, घोटेवाडी (आशापुरी), दोडी बुद्रुक, दातली, केदारपूर, शहापूर, सोनवाडी, सुरेगाव, सरदवाडी, विंचूर दळवी, वडांगळी, पाथरे खुर्द, धोंडबार, आटकवडे, औढेवाडी, चिंचोली, दोडी खुर्द, फुलेनगर (माळवाडी), गोंदे, जोगलटेंभी, कोळगाव माळ, खडांगळी, मलढोण, रामनगर, सांगवी, वडझिरे, मिठसागरे, डुबेरे, फर्दापूर, गुळवंच, कोमलवाडी, कोनांबे, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, मीरगाव, माळेगाव, मापारवाडी, नायगाव, नळवाडी, फत्तेपूर, निºहाळे, पाटोळे, पिंपळगाव, पाडळी, पाथरे बुद्रुक, शिवडे, सोनगिरी, आगासखिंड, ब्राह्मणवाडे, शिवाजीनगर (दापूर), वारेगाव, बेलू या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत