सायखेडा : संत गाडगे बाबा राज्यस्तरीय विचार प्रबोधन यात्राअंतर्गत व सायखेडा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन प्रचारक श्रीकृष्ण धोटे यांचे व्याख्यान मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन व ग्रामस्वच्छता यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, वाईट रु ढी परंपरा, ग्रामस्वच्छता जादूटोणा विरोधी कायदा. वैज्ञानिक दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले. काही अंधश्रद्धेवर आधारित प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. के. सुर्यवंशी, सायखेडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक माळी, विभाग प्रमुख प्रा. प्रमोद घरटे, प्रा. मुरकुटे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक प्रा. आशा लांडगे यांनी केली. तर सूत्रसंचलन व आभार प्राध्यापक दीपाली काळे यांनी केले. या कार्यक्र मास कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
सायखेडा येथे अंधश्रद्धा निर्मुलनावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 6:07 PM
सायखेडा : संत गाडगे बाबा राज्यस्तरीय विचार प्रबोधन यात्राअंतर्गत व सायखेडा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन प्रचारक श्रीकृष्ण धोटे यांचे व्याख्यान मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे आयोजित करण्यात आले होते.
ठळक मुद्देअंधश्रद्धेवर आधारित प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.