येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि: शाला शिक्षण मंडळाच्या वतीने येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न झाली. व्याख्यानमालेच्या प्रारंभी भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी गुंफले. आपल्या नाट्यात्मक शैलीत ‘सावित्री तू होती म्हणूनच’ या विषयावर विचार मांडले. आज मुली सबला झाल्या असून शिक्षण घेऊन वेगवेगळया क्षेत्रात पदार्पण करत आहे व स्त्रियांच्या पंखात बळ भरले आहे. हि उमेद केवळ सावित्रीबाई मुळेच मिळत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केल. दुसऱ्या व्याख्यानात श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला देवरे यांनी नैतिक मूल्याची घसरण हि गंभीर व दुर्दैवी बाब असल्याचे सांगून पाश्चात्यांचे अनुकरण थांबवून भारतीय संस्कृतीची मुल्ये जपण्याचे आवाहन केले. गार्गी, मैत्रियी पासून तर यादव काळा पर्यत अनेक स्त्रीयांच्या कार्याचा संत कवियत्री व साहित्यिक स्त्रियाचे संदर्भ दिले. अॅड मिलन खोहर यांनी अखेरच्या व्याख्यानात आज कायद्याचा धाक समाजाला वाटत नाही. गुन्हेगारी वाढत आहे, गुन्हा करणे हि प्रतिष्ठा झाली आहे, स्त्री पुरु षासाठी कायदे समान आहे. याचे ज्ञान मुलींनी आत्मसात करावे. या कार्यक्र मादरम्यान प्राचार्य डॉ.हरीश आडके, प्रा. भाऊसाहेब गमे, प्रा. टी.एम.सांगळे, प्रा. व्ही.डी. सूर्यवंशी, प्रा. संतोष कन्नोर, प्रा. चंद्रकला शेवाळे, प्रा. डॉ. एस.डी.थोरे, यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.(वार्ताहर)
येवला महाविद्यालयात व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 10:10 PM