नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले. निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. लिमये सभागृह येथे निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी राजाभाऊ काठे, उद्योजक चंद्रकांत बागुल, राकाशेठ माळी, नगरसेविका सुप्रिया खोडे, अनिल जाधव, सुनील खोडे, विजय राऊत आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून डोंबिवली येथील पुरुषोत्तम वाघ, नाशिकचे जयंत बेहळे, दत्तात्रय वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउण्डेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सचिव नितीन पाटील यांनी केले, तर आभार बाबासाहेब खरोटे यांनी मानले. यावेळी संदीप बच्छाव, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, अंबादास शेळके, सचिन बागुल, दादाजी बागुल, जयराम सोनवणे आदी उपस्थित होते.विजेते स्पर्धक‘शिवजयंतीचे जनक : म. जोतिराव फुले, छत्रपती शिवराय-म. फुले-डॉ. आंबेडकर : एक आदर्श गुरु-शिष्य परंपरा, म. फुले व त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. आंबेडकरांची आरक्षण विषयक भूमिका’ या विषयांवर ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक नाशिक येथील अमोल गुट्टे याने पटकाविला. द्वितीय क्रमांक जुन्नर येथील शुभम गाढवे याने, तर तृतीय क्रमांक निफाड येथील तेजस्विनी शिंदे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षिसाचे मुरबाड येथील महेश घावट व धुळे येथील प्रा. सतीश अहिरे हे मानकरी ठरले.
वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:09 AM