सिन्नर : रब्बी पिकांसाठी कडवा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला पाणी सोडण्यात आले. ते टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे १ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. रब्बीच्या सिंचनासह पिण्यासाठी दोन तलाव भरण्यात येणार आहेत.
सहायक कार्यकारी अभियंता संतोष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आवर्तनाचे नियोजन आखण्यात आले आहे. कालव्याला वीस दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा गहू, हरभरा, फळबागा, मका आणि पिकांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी नियोजनाप्रमाणे सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रब्बीसाठी १७ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. एक हजार शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ झाला. ४५० दलघफू पाणी पहिल्या आवर्तनात वापरले गेले. भूजल पातळी टिकून असल्याने मागणी मर्यादित राहिली. तथापि, पुढच्या आवर्तनाला मात्र शेतकऱ्यांकडून पाणी मागणी वाढेल असे चित्र लाभक्षेत्रात दिसून येत आहे.
इन्फो...
डोंगळे शोधमोहिमेला सुरुवात
शिंदे येथून डोंगळे शोधमोहिमेला लगेचच सुरुवात करण्यात आली. म्हाळसाकोरे व सिन्नर तालुक्याच्या हद्दीत दोन दिवसांत डोंगळे काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. चार शाखा अभियंत्यांसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यावर दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार आहे.
इन्फो...
दोन बंधाऱ्यांत पाणी सोडणार
दुसऱ्या आवर्तनात ६० दलघफू पाणी सिंचनासाठी ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे वडांगळी पाणी योजनेचा साठवण तलाव भरण्यात येईल. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना तीन महिने पाणीटंचाई जाणवणार नाही. पांगरी पाणी योजनेसाठीही डांबर नाला बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
===Photopath===
100221\10nsk_4_10022021_13.jpg
===Caption===
कडवा धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी. (संग्रहीत छायाचित्र)