देवळा : तालुक्यातील भावडे येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने विश्वास वसंत मोरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पशुपालक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात वडाळे येथील प्रदीप कारभारी सोनवणे ह्या शेतकºयाचा बैल बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमी झाला होता. देवळा चांदवड सीमेलगत असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या जंगलात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बिबट्याचा संचार असून, अनेक ग्रामस्थांना तो दिसला आहे. भिलवाड, कापशी, वडाळे, भावडे आदी गावालगत असलेल्या डोंगरावर घनदाट जंगल असल्याने हिंस्त्र पशूंचा नेहमीच वावर असतो. भावडे येथील शेतकरी विश्वास मोरे यांची कपशिफाटा येथे शेती असून, ते शेतातच वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी घराशेजारी बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासरावर अचानक हल्ला करून नरडीला चावा घेतला, त्यावेळी मोरे यांच्या मुलाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. सदर हल्ल्यात वासरू ठार झाले असून, मोरे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तशा आशयाची तक्र ार मोरे यांनी वनविभागाकडे केली आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. पालेपवार यांच्या मार्गदर्शना- खाली वनाधिकारी आर. जे. गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार भावडे : नागरिकांमध्ये घबराट; पिंजरा लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:42 PM
देवळा : तालुक्यातील भावडे येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने विश्वास वसंत मोरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासराचा मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देबैल बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमी हिंस्त्र पशूंचा नेहमीच वावर