शिबिरात सटाणा न्यायालयाचे विधिज्ञ प्रणव भामरे यांनी उपस्थितांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बद्दल मार्गदर्शन केले. तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश आव्हाड यांनी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यामागचा उद्देश तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत कोणकोणते विभाग अथवा योजना येतात, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. नाशिक वकील फेडरेशनचे अध्यक्ष तथा सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पंडितराव भदाणे यांच्यासह पक्षकार, सटाणा न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो- २३ सटाणा कोर्ट
सटाणा न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना न्यायाधीश विक्रम आव्हाड समवेत. पंडितराव भदाणे आदी.
===Photopath===
230221\23nsk_14_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ सटाणा कोर्ट सटाणा न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करतांना न्यायाधीश विक्रम आव्हाड समवेत. पंडितराव भदाणे आदि.