एक स्तुत्य उपक्रम़़़महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फ त ‘न्याय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जातो़ यासाठी फि रते विधी सेवा केंद्र व लोकअदालतीचे आयोजन केले जाते़ नाशिक जिल्ह्यात १६ ते ३० जून या कालावधीत मोबाईल व्हॅनचा उपक्रम राबविण्यात आला़ जिल्ह्यातील १६ ठिकाणी ही व्हॅन जाऊन लोकअदालतीचा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये एकूण ६७३ (फ ौजदारी व दिवाणी) दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे निकाली काढण्यात आले़- राजेश पटारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक़असा होता जूनमधील दौरा़़़‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमातील मोबाइल व्हॅनचा नाशिक जिल्हा दौऱ्याचा कालावधी हा १६ ते ३० जून या कालावधीत होता़ १६ जूनला नाशिक, १७ जून- इगतपुरी, १८ जून- सिन्नर, १९ जून- पिंपळगाव व चांदवड, २० जून- नांदगाव व मनमाड, २१ जून- मालेगाव, २३ जून- येवला, २४ जून- निफ ाड, २५ जून- सुरगाणा, २६ जून- दिंडोरी, २७ जून- कळवण, २८ जून- सटाणा, ३० जून- नाशिकरोड या ठिकाणी जाऊन लोकअदालत घेण्यात आली़व्हॅनमधील सदस्य व त्यांची जबाबदारी़़़ल्लनिवृत्त किंवा कार्यरत न्यायिक अधिकारील्लवकिल / सरकारी अधिकारी ल्लकायद्याचे विद्यार्थी / शिक्षकल्लसदर भागातील सामाजिक कार्यकर्ताल्लसंबंधित भागात लोकांवर चांगला असलेली व्यक्ती़ल्लस्थानिक भाषेत नव्या कायद्यांची माहिती देणे़ल्लशिबिरास येणाऱ्यांना समुपदेश व सल्ला देणे़ल्ललोक अदालत दरम्यान पक्षकारांमधील वादाचे निराकरण, समेट व समझोता घडवून आणणे़ल्लवाद दाखल करावयाचा असल्यास विधी सेवा व विधी सहाय्याबद्दल माहिती देणे़
फि रते विधी सेवा व लोक अदालत योजना
By admin | Published: July 02, 2014 10:01 PM