नाशिक : नाट्यमय घडामोडी आणि राजकीय उलथापालथीने गाजलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, राष्टÑवादीचे अॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे याचबरोबर जिल्हा बॅँकेचे संचालक अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आयोगाने करडी नजर ठेवली असून, सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.महापालिका आणि नगरपालिकांचे नगरसेवक तसेच पंचायत समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी पंधरा मतदान केंद्रे आहेत. मतपत्रिकांवर पसंतीक्रमानुसार मतदान देण्याची पद्धत असल्याने त्यासंदर्भात विशेष दक्षता घेऊन मतदार याद्या केंद्रांवर पोहोचवण्यात आल्या आहेत. रविवारी (दि.२१) सुटी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय गजबजले होते. मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मतदानाच्या प्रक्रियेची नियमावली व अन्य बाबतीत मार्गदर्शन केले. मतदान पंधराही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता होईल. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफर नियुक्त करण्यात आले असून, गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी मायक्रो आॅब्जरवर नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.ओळखपत्र आवश्यकया निवडणुकीत मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक असून, पुरावे असल्यासच मतदान करता येणार आहे.
विधान परिषदेचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:04 AM
नाशिक : नाट्यमय घडामोडी आणि राजकीय उलथापालथीने गाजलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, राष्टÑवादीचे अॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे याचबरोबर जिल्हा बॅँकेचे संचालक अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आयोगाने करडी नजर ठेवली असून, सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.
ठळक मुद्देतिरंगी लढतीत प्रतिष्ठा पणाला मतदान तयारी पूर्ण