शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

वारसदारासाठी नेत्यांची कसरत

By admin | Published: February 12, 2017 10:17 PM

येवला : अवघे कुटुंब रंगले प्रचारात

दत्ता महाले येवलाजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा प्रथमच सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. आमदार छगन भुजबळ यांची गैरहजेरी, भाजपा-सेनेची काडीमोड आणि राष्ट्रवादी-कॉँग्रेसमध्ये झालेली बिघाडी यामुळे चारही गटात यंदा स्थानिक नेत्यांनी आपले वारसदार या निवडणुकीत उतरवले आहेत. चारही गटांत आव्हान उभे राहिल्याने स्थानिक नेत्यांचा अवघा परिवार सध्या आपापल्या गटात राबत आहेत. वाडी वस्ती पिंजून काढत आहेत. शिवाय गाव तेथे गाडी असा शिरस्तादेखील ठरला आहे. उमेदवारांसह समर्थकांची वाहने पहाटेपासूनच वाडी वस्त्यांच्या दिशेने धावू लागली आहेत. गट-गण पिंजून काढत आहेत. सध्या बांधावर लक्ष ठेवाची हाक ऐकू येऊ लागली आहे.अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भ्रमणध्वनीवरून आलेल्या संदेशाचा मान ठेवत आपले सुपुत्र शाहूराजे शिंदे यांची सोमवारी माघारी होणार असल्याचे सोशल संकेत मिडिया वरून दिले आहेत. गेल्या १४ वर्षापासून आमदार छगन भुजबळ यांच्या एकछत्री अंमलाखाली चाललेल्या कारभाराला प्रथम पालिकेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यात पक्षांतर्गत शह दिला गेला. जहाज बुडू लागल्याची चाहूल लागताच अनेकांनी बाण हातात धरून उड्या घेतल्या. दरम्यान, माजी आमदार मारोतराव पवार यांनी नगरसूल गटातून आपली सून, सहकारनेते अंबादास बनकर यांनी आपले सुपुत्र संजय बनकर यांना पाटोदा गटातून, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आपली पत्नी सुरेखा दराडे यांना वारसदार ठरवत उमेदवारी घेतली.अंदरसूल गटातून माणिकराव शिंदे यांनी आले सुपुत्र शाहूराजे शिंदे यांना उमेदवारीतून थांबवत असल्याचे संकेत देऊन अंदरसूलसह प्रत्येक गटात बारकाईने लक्ष देण्याची खेळी करणे पसंत केले. यामुळे रिंगणात असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालिकेत झालेली जखम भरून काढण्याचा प्रयत्न शिंदे नक्की करतील असा सूर आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता ताब्यात ठेवली तर आगामी आमदारकीचा दरवाजा उघडणे सोपे जाते हा अंदाज बांधून घरचा हक्काचा पक्का वारसदार निवडून आणण्यासाठी स्थानिक नेते सरसावले आहेत.माजी आमदार कल्याणराव पाटील, आनंद शिंदे, राजूसिंग परदेशी यांनी जाणीवपूर्वक नेत्यांच्या गटात लक्ष घातले. त्यामुळे पाटोदा, राजापूर, अंदरसूल, मुखेड या चारही गटात मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक नेत्यांनी आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी केलेल्या खेळीवर नजर ठेवत, आपला आवाका नसताना भाजपाने तब्बल तेरा उमेदवार दिले. विशेषत: त्यांनी नगरसूल गटात उमेदवार मिळाला नाही की दिला नाही? हा चर्चेचा विषय आहे. राजापूर गटावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित करून ढाकणे यांना उमेदवारी दिली आहे.