नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेचे निकाल परीक्षा झाल्यानंतर तब्बल ७८ दिवस उलटूनही प्रलंबित आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांनंतर निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. परंतु, विद्यापीठ परीक्षा विभागाने विधी शाखेचे निकाल रखडवले असून, याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षी अभियांत्रिकी शाखेचे निकाल रखडले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हे प्रकरण गाजले होते. आता विधी शाखेच्या निकालातही विद्यापीठाकडून अशीच दिरंगाई होत असल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.विद्यार्थ्यांच्या नाराजीचे पडसाद नाशिकमधील विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयात उमटले. या आंदोलनात अजिंक्य गिते, वैभव वाकचौरे, अभिजित गवते, सिध्येश्वर लांघी, अभिजित जंगम, सौरभ देशमुख, वैभव थेटे, चैतन्य बोडके,अमोल जोंधळे, अंजिक्य गुळवे, संकेत मुठाळ आदी विद्यार्थी व विद्यार्थी संघटना प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
७८ दिवसांनंतरही विधी शाखेचे निकाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:53 AM