नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांनाही मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोसंबी, संत्री व लिंंबाना मोठी मागणी आहे. मात्र उन्हाळा व वाढती मागणी लक्षात घेता या फळांचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवत असताना आता नाशिककरही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय करू लागले आहेत. कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंब, संत्री, माेसंबी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे. ही फळे व विविध प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने मोसंबी, संत्री व लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. काही महिन्यांपूर्वी तीस रुपये किलो या
दराने मिळणारे लिंबू आता १०० रुपयांवर पोहोचले आहेत. मोसंबीही ६० ते ७० रुपयांहून १२५ रुपयांवर गेली आहे. तर संत्र्यांची आवक कमी झाली असून दरही १२० ते १३० रुपयांवर आहेत.
प्रतिकिलो दर
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल
लिंबू ३० - ५० - ७० - १००
मोसंबी ७० - ७० - १०० - १२०
संत्री ४० - ६० - १०० - १२०
इन्फो
३० टक्क्यांनी वाढले दर
नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी होता. तसेच हिवाळा असल्याने लिबू, संत्री आणि मोसंबी या रसवर्गीय फाळांना फारसा उठाव होत नव्हता, जानेवारीतही हीच परिस्थिती कायम होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाटला आता मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाला सुरुवात झाल्याने लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत. उत्पादन कमी व मागणीत वाढ झाल्याने फळांचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
इन्फो-
मोसंबी औरगाबाद, संत्री नागपूर तर लिंबाची विजापूर, पंढरपूरहून आवक होते.
नाशिक जिल्ह्यात परजिल्ह्यातून फळांची आवक मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दाखल होणारी मोसंबी ही औरंगाबाद येथून तर संत्री ही नागपूर जिल्ह्यातून येते. जिल्ह्यात लिंबाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे लिंबू कर्नाटक राज्यातील विजापूर, पंढरपूर येथून जिल्ह्यात येतात.
--
मी फळे खातो, तुम्हीही खा..,
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. संत्री, मोसंबी, लिंबू ही रसवर्गीय फळे ही उणीव भरून काढतात. त्यामुळे सर्वांनीच फळांचे सेवन करायला हवे, आमच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आहारात नियमात फळांचा समावेश करण्यात आला आहे.
राजेश जाधव- इंदिरानगर
---
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे बनले आहे. सर्व प्रकारची फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यात आहारात फळांचा नियमित वापर सुरू केला आहे.
-विलास पवार, नाशिकरोड.
----
तज्ज्ञ म्हणातात...
विविध जीवनसत्व असलेली फळे सेवन केल्याने शररीताल रोग प्रतिकार शक्ती वाढते. मात्र केवळ फळे आणि पोषक आहारामुळे कोरोनावर मात करता येत नाही .रोग प्रतिकार शक्ती कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारी असली तरी सर्वांनीच प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त हो आहे.
--
फळ व पालेभाज्यांचा आहारात समावेश असणे अत्यत महत्वाचे आहे. फळे पालेभाज्यांमुळे शरीरराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे कोरोनाचा वाढता फैलाव पाहता प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने फळांचा आहारात समावेश करावा. असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.
===Photopath===
080421\08nsk_8_08042021_13.jpg~080421\08nsk_10_08042021_13.jpg
===Caption===
डमी सोबत जोडली आहे. ~डमी सोबत जोडली आहे.