सुरेगाव चौफुलीजवळ वाळिबा पुंजा सांगळे यांची शेतजमीन व विहीर आहे. रविवारी (दि.५) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वस्तीवर राहणारे सुकदेव बुचकुल हे विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत होता. विहिरीच्या कपारीला बिबट्या बसलेला होता. बुचकुल यांनी शेतमालक गणेश सांगळे व माजी उपसरपंच रामनाथ सांगळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सांगळे यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, सुधीर बोकडे आदींंसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विहीर खोल असल्याने बिबट्याला बाहेर काढताना अडचणी लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा आणला. विहिरीचा वरचा भाग मोकळा असल्याने वनविभागाने वावी येथून किरण पाटील यांची हायड्रोलिक क्रेन मागविली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास विहिरीत पिंजरा सोडला. पिंजरा सोडल्यानंतर काही काळ बिबट्या पिंजऱ्यापर्यंत येत होता व परत माघारी जात होता. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची घालमेल होत होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि त्याला क्रेनच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या पाच ते साडेपाच वर्षांचा असून नर जातीचा बिबट्या आहे. सिन्नर येथील वन उद्यानात बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
इन्फो
बिबट्या व मांजर दोघेही विहिरीत
विहिरीचा अंदाज न आल्याने व मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या व मांजर हे दोघेही विहिरीत पडले असल्याचा अंदाज असून रात्रभर दोघांचा मुक्काम विहिरीत होता. दोघांनी परस्परविरोधी बाजूला कपारीचा आधार घेतला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याला काढल्यानंतर पुन्हा क्रेनद्वारे एका युवकाला विहिरीत पाठवून मांजरालाही वनविभागाने बाहेर काढले.
फोटो - मेलने पाठविले आहेत....
सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आले.
050921\055205nsk_38_05092021_13.jpg~050921\055205nsk_39_05092021_13.jpg
फोटो - ०५ सिन्नर बिबट्या १~फोटो - ०५ सिन्नर बिबट्या २