पांढुर्ली येथील यश अशोक वाजे (१४) व आतेबहीण तृप्ती रवींद्र तांबे (१७) हे सकाळी सहा वाजेच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. घरापासून काही अंतरावर जाताच झुडपातून बिबट्याने जोराची झेप घेतली. दुचाकीचालक यश अशोक वाजे (१४) याच्या पोटरीत चार दात घुसले. त्याने जोरात पाय झटकून जबड्यातून पाय सोडवला खरा, मात्र बिबट्याने चवताळून पुन्हा जोराचा हल्ला केला. यावेळी पाठीमागे बसलेली तृप्ती रवींद्र तांबे (१७) हिच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या बॅगमध्ये बिबट्याचे दात अडकले. बिबट्या तिला मागे खेचू लागला, तर यश एका हाताने दुचाकी चालविण्याबरोबरच दुसऱ्या हाताने तिला ओढून धरू लागला. सुमारे ५० मीटर जीवन-मृत्यूची शर्यत रंगली. बॅग फाटली तेव्हा तृप्तीची सुटका झाली. यात तिच्या कमरेला व मांडीला बिबट्याने पंजे मारून जखमी केले आहे. प्रसंगावधान राखून यशने एका हाताने दुचाकी दामटली तर दुसऱ्या हातात तृप्तीला ओढून धरले. बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केला; परंतु दुचाकी जोरात काढल्याने दोघेही बचावले.
इन्फो
वन विभागाने लावला पिंजरा
सुटका झाल्यानंतर दोघांनीही परत मागे फिरून पाहिले नाही. दुचाकी गावात घेऊन जात यशने ग्रामस्थांना घटना सांगितली. दोघांवरही पांढुर्ली आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी घटनेची माहिती घेतली. वन परिमंडळ अधिकारी पंडित आगळे, वनपाल कैलास सदगीर यांनी यश व तृप्तीची भेट घेतली. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वाजे वस्तीवर तातडीने पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
फोटो ओळी-
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले
१८ तृप्ती तांबे
१८ यश वाजे
===Photopath===
180221\18nsk_18_18022021_13.jpg~180221\18nsk_19_18022021_13.jpg
===Caption===
१८तृप्ती तांबे~१८ यश वाजे