नाशिक : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड परिसरात बिबट्याचा संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वन विभागाचे पथक गंगापूर पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरात बिबट्याचा शोध घेतला जात असताना कोठेही बिबट्या आढळून आलेला नाही. मात्र सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिला गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.
कॉलेज रोड येवलेकर मळा महाविद्यालयाचा परिसर पिंजून काढला जात आहे. तसेच ड्रोन द्वारे शोध घेण्याचा प्रयत्न वनविभागाचे पथक करत आहे. मात्र या भागात बिबट्या नेमका खोटे दडून बसला याचा अद्यापही वन विभागाला माग लागलेला नाही. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नागरिकांची गर्दी मात्र नियंत्रणात आहे. बिबट्याच्या भागात नजरेस पडला त्या भागाकडे येणारे सर्व रस्ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बंद केले आहे.
दरम्यान, गंगापूर पोलीस, सरकारवाडा पोलीस घटनास्थळी बंदोबस्त दाखल झाले आहेत. वनविभागाचे रेस्क्यू पथक स्थितीवर लक्ष ठेवून आहे. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी घटनास्थळी भेट दिली असून पथकाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारची घबराट वापरणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात घेण्यास त्यांनी सांगितले आहे.
नागरिकांना कुठेही बिबट्या दिसल्यास तत्काळ वनक्षेत्रपाल भदाणे यांचा मोबाईल क्रमांक 8308713788 संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हा क्रमांक आपत्कालीन स्थिती हेल्पलाईन क्रमांक म्हणून फुले यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी हा फोन न करता थेट या क्रमांकावर कुठलीही माहिती अथवा मदत मागावी असे वन विभागाने कळविले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली महिला धोक्याच्या परिस्थितीबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. धाराबाई दगडू रणबावळे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.