सिन्नर : तालुक्यातील विंचुरीदळवी व पांढुर्ली या गावांच्या सरहद्दीवर खंडेराव टेकडी पाझर तलावाजवळ बुधवारी (दि. ६) सकाळी आठच्या सुमारास द्राक्षबागेत बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडले. तथापि, एक बिबट्या पसार झाला असून, दुसरा बागेखालील नाल्याच्या पाइपमध्ये अडकला होता. शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यास पकडण्यात आले. सकाळी ११च्या सुमारास वनविभागाने बिबट्यालापकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्या पिंंज-यात अडकलेला नव्हता. वनविभागाचे अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर सायंकाळी बिबट्या जेरबंद झाला.दरम्यान, सकाळी द्राक्षबागेत परप्रांतीय मजुरांना बिबट्याच्याजोडीचे दर्शन घडल्यानंतर त्यांनी या जोडीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. जवळपास दोन तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर एका बिबट्याने पळ काढला, तर दुसरा नाल्याच्या पाइपमध्ये अडकला.दोनशे फूट लांब नाला स्थानिक नागरिकांनी काटेरी झुडपे लावून बंद केला. बिबट्या अडकल्याची खात्री पटल्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागासह स्थानिक नागरिक सायंकाळी उशिरापर्यंत बिंबट्या पिंंजºयात अडकण्याची प्रतीक्षा करीत होते. सायंकाळी उशिरा बिबट्या पिंजºयात आला.
नाल्यात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 9:02 PM