नाशिक- शहरालगत लहवित रोड दारणा पंपिंग स्टेशन जवळ एका शेतात आज पहाटे एक बिबटया वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा संचार असल्याने नागरिक भयभीत झाले होते त्यामुळे वन खात्याने पिंजरा लावला होता.आज पहाटे येथील शेतकरी नारायण पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. यानंतर भगुर नगरपालिकेचे नगरसेवक मोहनराव करंजकर, देवळाली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी बिबट्या जेरबंद झाला त्या स्थळी पाहणी केली. या भागात एक मादी व दोन बछडे यांचा अजूनही संचार आहे त्यामुळे वनविभागाने याभागात पिंजरा कायम ठेवावा अशी मागणी रत्नाकर मोहिते,चंद्रशेखर मोहिते यांच्यासह परीस्तरातील अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.