निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा नर बिबट्या अंदाजे पाच वर्षाचा आहे. निफाड तालुक्यात एप्रिल महिन्यात आतापर्यंत एकूण तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. तामसवाडी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने आठ दिवसापूर्वी तामसवाडी येथील मधूकर कचरू सांगळे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. दि २९ रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल. ही बातमी तामसवाडीचे पोलीस पाटील पांडुरंग शिंदे यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल जी. बी. वाघ, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख व इतर रोजंदारी वनमजूर यांनी तामसवाडी येथे जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले व निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सदर बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली होती.--------------------------यावर्षी एप्रिल महिन्यात २९ तारखेपर्यंत निफाड तालुक्यात एकूण तीन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. १० एप्रिलला लालपाडी येथे माणिक सानप यांच्या शेतात चार वर्ष वयाचा मादी बिबट्या जेरबंद झाला होता तर २२ एप्रिलला दारणा सांगवी येथे दगु करपे यांच्या शेतात पाच वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला होता. २९ एप्रिलला तामसवाडी येथे मधुकर सांगळे यांच्या शेतात पाच वर्ष वयाचा नर बिबट्या बिबट्या पिंजर्यात जेरबंद करण्यात आला आहे.----------------------
तामसवाडी येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 5:17 PM