नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच मंगला घुगे यांनी केली आहे. ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्यामुळे गाव व परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात अनेकांना भरदिवसाही नजरेस पडत असल्याने भीती व्यक्त होत आहे. परिसरातील मोह, मोहदरी व शिंदे शिवारात वारंवार दिसणाºया बिबट्याची परिसरातील शेतकरी, मजूर तसेच पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतातील कांदा काढणीचे काम सुरू असल्याने शेतात मेंढ्या, शेळ्यांचे आखर बसत आहे. रात्रीच्या वेळी दावनीची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी जागता पहारा देण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसात नायगाव, जायगाव व देशवंडी परिसरात या बिबट्याने अनेक जनावरांना आपले भक्ष बनविले आहे.
सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:17 AM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण जागता पहारा देण्याची वेळ