शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:34 AM

इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे.

ठळक मुद्देआयुष्यभराची कैद नशिबीपुनर्वसन केंद्रात हलविण्याबाबत उदासीनता

नाशिक : इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे. पिंजऱ्यात कैद भोगताना हा बिबट्या अत्यंत आक्रमक व तणावाखाली आला आहे. त्यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर बोरीवली किंवा जुन्नर येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रात हलविणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत पश्चिम वनविभाग उदासीन असल्याचे दिसते.इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा असून, हा बिबट्या जेरबंद झाल्यापासून अत्यंत आक्रमक आहे. जवळपास मागील एक महिन्यापासून लहानशा ट्रॅप पिंजऱ्यात बिबट्या कैदेत असल्याने तो अधिकच चिडखोर बनला आहे. या बिबबट्याने पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीवर स्वत:चे डोके आदळून कपाळही काही दिवसांपूर्वी फोडून घेतले होते. उपचारानंतर ती जखम भरून आलीस असली, तरी बिबट्याने मात्र त्याचे दात या धडकांमध्ये कायमचे गमावले आहेत. एकूणच या लहानशा पिंजऱ्यात अडकल्यापासून बिबट्याची अधिकच वाताहत होताना दिसत आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आता कदापि शक्य नाही. किंबहुना, ते मानवी जीवनासाठीही सुरक्षित नसल्यामुळे पुनर्वसन केंद्रात बिबट्याचे पुढील संगोपन केले जाणार आहे. मात्र, या बिबट्याचा बोरीवली किंवा जुन्नरचा प्रवासाला पश्चिम वनविभागाकडून ‘हिरवा कंदील’ कधी मिळेल? याकडे आता वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.बोरीवली अन‌् माणिकडोह ‘हाउसफुल्ल’बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील, तसेच जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट रेस्क्यू सेंटर सध्या हाउसफुल्ल झाले आहेत. बोरीवलीची एकूण क्षमता २४ बिबट्यांची असली, तरीही त्यांना संगोपनाकरिता काही पिंजरे रिकामे ठेवावे लागतात. त्यामुळे १८ बिबटे ठेवण्यापर्यंत तेथे बिबट्यांना स्वीकारले जाते. सध्या येथे १५ बिबटे असून, यामध्ये नाशिकचे तीन आहे. या ठिकाणी वैद्यकीय सोईसुविधाही तोकड्या आहेत. त्या तुलनेत माणिकडोह केंद्र मोठे असून, येथे ३६ बिबटे एकाच वेळी ठेवता येऊ शकतात आणि या केंद्रासाठी स्वतंत्र यंत्रणा व मनुष्यबळ कार्यरत आहे. मात्र, येथे सध्या ३४ बिबटे आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या