सायखेडा : गोदावरी नदीच्या खोर्यात सातत्याने बिबटया दिसत असून अनेक ठिकाणी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश येत असले तरी बिबट्याचे दर्शन आणि पिंजरा नित्याचेच झाल्याने इथले भय काही केल्या संपायला तयार नसल्याने गोदाकाठ भाग भयग्रस्त झाला आहे.मागील काही दिवसांपूर्वी चांदोरी, चितेगाव, चाटोरी, तामसवाडी या गावात एकाच भागात दोन दोन बिबटे पकडल्याची घटना नवीन असतांनाच काल रात्री सहा वाजता सायखेडा येथील गोदानगर जवळील कुटे वस्ती वर सुरेश यशवंत भोज यांच्या सायखेडा-शिंगवे गावाच्या हद्दीवर गट नं. ९६३ मध्ये एक ते दीड वर्षांची मादी द्राक्षबागेत जेरबंद झाली असून परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र एक मादी पकडली असली तरी अद्यापही काही ग्रामस्थांना याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असल्याने पुन्हा याच ठिकाणी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्यास पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पिंजर्यांचा वापर करण्याची मागणी गोदाकाठमधील ग्रामस्थ करत आहेत. पकडला गेल्याची माहिती मिळताच कुटे वस्तीवरील अक्षय कुटे, रोहित कुटे, अभिजित कुटे, रमेश कुटे, महेश कुटे तसेच सायखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य धनंजय कुटे यांनी भेट दिली. तसेच बिबट्या पिंजर्यात पकडला गेल्याची माहिती सुरेश यशवंत भोज यांनी वनविभागास कळवुन वनविभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भैय्या शेख यांनी जेरबंद बिबटयाला ताब्यात घेतले.
सायखेड्यात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:03 PM
गोदावरी नदीच्या खोर्यात सातत्याने बिबटया दिसत असून अनेक ठिकाणी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश येत असले तरी बिबट्याचे दर्शन आणि पिंजरा नित्याचेच झाल्याने इथले भय काही केल्या संपायला तयार नसल्याने गोदाकाठ भाग भयग्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देदहशतीने गोदाकाठ भयग्रस्त