लोकमत न्यूज नेटवर्कजानोरी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे दर्शन घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चिंचखेड येथे शेतकरी जीवन संधान यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून ठार केले. त्याआधीदेखील बिबट्यांनी परिसरातील अनेक कुत्रे फस्त केली आहेत.या घटनेनंतर वनविभागाने दोन नंबर चारी येथील भगवान सुखदेव पाटील यांच्या द्राक्षबागेच्या कोपऱ्यावर पिंजरा लावला. रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने चिंचखेड गावाच्या वेशीवर दर्शन दिले. त्यानंतर चिंचखेड गावच्या उंबरखेड शिवरस्ता परिसरात डरकाळ्यांचा आवाज आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चिंचखेड येथे दोन बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.बिबट्याच्या भीतीने शेतमजूरदेखील शेतात जात नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. चिंचखेड येथे गेल्यावर्षी बिबट्या जेरबंद झाला होता. वनविभागाने या बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनामार्फत करण्यात आली आहे.
चिंचखेड येथे बिबट्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 9:34 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे दर्शन घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचखेड येथे शेतकरी जीवन संधान यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून ठार केले. त्याआधीदेखील बिबट्यांनी परिसरातील अनेक कुत्रे फस्त केली आहेत.
ठळक मुद्देबिबट्यांनी परिसरातील अनेक कुत्रे फस्त केली