शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विंचुरे परिसरात बिबट्याचा वावर

By admin | Published: January 31, 2015 12:16 AM

विंचुरे परिसरात बिबट्याचा वावर

विंचुरे : बागलाण तालुक्यातील विंचुरे, जोरण, किकवारी आदि गावांमध्ये बिबट्याने दहशत घातली असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने परिसरात उच्छाद मांडला असून, पशुधनावर त्याने ताव मारायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. किकवारी येथील एका महिलेच्या पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. त्या महिलेला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळाली नाही, तोच बिबट्याने विंचुरे येथील आदिवासी शेतमजूर धोंडू सोनवणे हे नदी काठी शेळ्या चारत असताना बिबट्याने हल्ला करून शेळी ओढत नेली. सोनवणे यांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या त्यांच्यावरच गुरगुरत शेळी घेऊन निघून गेला. बिबट्या मादी बरोबर तिचे दोन बछडेही आहेत. असे गावातील काही नागरिकांनी सांगितले. एके दिवशी तर चक्क संध्याकाळी बिबट्या गावातील आदिवासी वस्तीपर्यंत आल्याने नागरिक घाबरून गेले. विंचुरे येथील उपसरपंच हेमंत बच्छाव यांचा कुत्राही बिबट्याने फस्त केला. काही दिवसांपूर्वी किकवारी खुर्द येथील तरुण शेतकरी सतीश वाघ यांच्यावरदेखील ते शेतात गवत कापत असताना पाठीमागून हल्ला केला, मात्र सुदैवाने ते वाचले. नागरिकांनी सटाणा येथील वनविभाग कार्यालयात जाऊन पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी केली. पिंजरा लावला मात्र सहा दिवस पिंजरा लावूनही बिबट्या त्यात अडकला नाही. वनरक्षक शेख आणि त्यांचे एक सहकारी सहा दिवस रात्री पिंजऱ्या जवळ पहारा देत होते मात्र बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने त्यांना नाइलाजाने पिंजरा तेथून काढावा लागला. (वार्ताहर)