शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

भुसे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:17 PM

सायखेडा : निफाड तालुक्यातील भुसे, म्हाळसाकोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरंबद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये समाधान : वनविभागाच्या पिंजऱ्यात अलगद अडकला

सायखेडा : निफाड तालुक्यातील भुसे, म्हाळसाकोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरंबद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.या बिबट्याने परिसरातील वासरे, अनेक कुत्रे फस्त केली होती, शेतात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने बातमी प्रसिद्ध करत वनविभागाला पिंजरा लावण्यास भाग पाडले. या पिंजऱ्यात दोन दिवसांनी अलगद बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला आणि पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर पिंजऱ्यात अडकलेला नर आहे आणि याच भागात मादी असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. दोघांनाही सोबत फिरताना पाहिले असल्यामुळे मादीला पकडण्यासाठी नवीन पिंजरा याच भागात लावला आहे.भुसे येथील ज्ञानेश्वर आघाव यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करीत त्याला ठार केले होते. त्यानंतर लागलीच ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. त्यांनतर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांत याच बिबट्याने ४-५ जनावरांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याच्या घटना भुसे गावात घडल्या आहेत.भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे वस्तीकडेया परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परिणामी, अनेकदा भक्ष्याच्या शोधात बिबटे वस्तीकडे येतात. अनेक वेळा महावितरणकडून सायंकाळी वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. अशावेळी जीव मुठीत घेऊन शेतकरी काम करीत असतात. यातून अनेकदा बिबट्याने हल्लेही केले आहेत. त्यामुळे दिवसा वीज मिळाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी करत आहेत, तसेच कायमस्वरूपी बिबट्याची दहशत संपवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.भुसे शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वनविभागाला कळवूनही पिंजरा लावत नव्हते. मात्र, ह्यलोकमतह्णमध्ये बातमी आली आणि तात्काळ पिंजरा लावला. बिबट्या अखेर जेरबंद झाला असला तरी परिसरात आणखी बिबट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो पकडले जावा.- ज्ञानेश्वर आघाव, शेतकरीभुसे येथे ज्ञानेश्वर आघाव यांच्या शेतात पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या.

(२८ सायखेडा १/२) 

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या