शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:21 PM

नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये दहशत; बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.जातेगाव आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधण्यात आली असून, त्याला लागूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाºया रुग्णांचाही बºयाचवेळा मुक्काम असतो. मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जायभावे आरोग्य केंद्रातील काम आटोपून निवासस्थानी गेले असता, थोड्या वेळातच त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. खिडकीतून त्यांनी डोकावून पाहिले त्यावेळी बिबट्या आरोग्य केंद्राच्या आवारात फिरताना दिसला, त्यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्याचे चित्रीकरणहीकेले.दरम्यान, यापूर्वीही बिबट्याने दोनवेळा आरोग्य केंद्रात दर्शन देत बाहेरून पकडून आणलेले कुत्रे फस्त केले आहेत. आरोग्यसेविकेच्या घराच्या पायरीवरच कुत्र्याचा फडशा पाडल्यामुळे कित्येक दिवस आरोग्य कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन आठवड्यांपूर्वीच आरोग्य कर्मचाºयांनी वनखात्याकडे तक्रार केली असता, पिंजरा लावण्याचे मान्य करण्यात आले; परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.सध्या कोरोनामुळे आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांना मुख्यालयी थांबणे तसेच दिवसरात्र कर्तव्यावर हजर ठेवण्यात येत असताना अशातच बिबट्याच्या सातत्याच्या संचारामुळे त्यांच्यात घबराट पसरली आहे. बुधवारी सकाळी बिबट्याच्या केंद्रात शिरकावाचे वृत्त कळताच जातेगावचे सरपंच, उपसरपंच, पोलीसपाटील आदींनी आरोग्य केंद्रात धाव घेतली.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या