मातोरी : जलालपूर परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले आहे. गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.जलालपूर भागातील शेतकरी भरत जाधव यांना दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी मानवी वस्तीच्या बाजूला बिबट्या संचार करताना दिसला होता. त्यांनी गावातील पोलीसपाटील मोहिते यांना कळविले. रानात चराई करणाऱ्या काही शेळ्यादेखील अज्ञात जनावराने खाल्ल्याची तक्रार मोहिते यांच्याकडे आली होती. त्यानुसार तत्काळ वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी त्यांनी केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या वास्तव्याच्या अंदाज घेऊन बुधवारी जाधव मळा व पारशी बाबा मळ्याच्या मध्यभागी पिंजरा लावला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या शेळीच्या शिकार करण्यासाठी जात असता पिंजऱ्यात जेरबंद झाला. मोहिते यांनी सकाळी वनविभागाला बिबट्या पिंजऱ्यात आल्याची माहिती दिली. माहिती मिळताच तत्काळ वन्यजीव रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. या वाहनातून पिंजरा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला.
जलालपूरला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:33 PM
मातोरी : जलालपूर परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले आहे. गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ठळक मुद्दे रात्रीच्या वेळी मानवी वस्तीच्या बाजूला बिबट्या संचार करताना दिसला