नाशिक : प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नााशिक जिल्ह्णात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी शुक्रवारी (दि. २१)दिली आहे. आरोग्यविषयक निष्काळजीपणा आणि आजार अंगावर काढण्याच्या मानसिकतेमुळे समाजातील लपून राहिलेले कुष्ठ रुग्ण, विनाविकृती शोधून त्यांना तत्काळ औषधोपचाराखाली आणण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येणार आहे, नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावरील औषधोपचाराच्या माध्यमातून कु ष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुष्ठरोगाचे दुरीकरणाचे उद्दिष्ट्ये साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अशाप्रकारे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहराच्या कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागातील जवळपास ८ लाख ६६ हजार ९५१ घरांचे प्रशिक्षित आशा व स्थानिक पुरुष स्वयंसेवकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात घरातील दोन वर्षांखालील बालके वगळता सर्व सभासदांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. स्त्रियांची तपासणी आशांमार्फत, तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले.७३३ पर्यवेक्षकांची नेमणूकनाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ३ हजार ३०४ पथक व शहरी भागात ३५६ पथका अशा एकूण ३ हजार ६६० पथकांकडून सर्वेक्षण करण्यात येणार असून, प्रत्येक पाच पथकांमागे एक पर्यवेक्षक या प्रमाणे ७३३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही यंत्रणा जिल्ह्णातील ८ लाख ६६ हजार ९५१ घरामध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे अंदाजित ४३ लाख ३५ हजार ३४३ नागरिकांची तपासणी करणार आहे. नाशिक जिल्ह्णाची एकूण लोकसंख्या ३७ लाख ६५ हजार ६२३ आहे. त्यामुळे जिल्ह्णातील प्रत्येक नागरिकांपर्यंत ही यंत्रणा पोहोचण्यास सक्षम असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी दिली.
२४ सप्टेंबरपासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:40 AM