नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक प्रतिबंध जागरु कता आणि रूग्णशोध अभियानास प्रारंभ झाला असून या मोहिमेत घरोघरी जाऊन रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.या अभियानात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील ३० टक्के लोकसंख्येमध्ये आशासेविका व पुरु ष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करून संशयित कुष्ठरूग्ण, क्षयरूग्ण व असंर्गजन्य रूग्ण शोधण्यात येत आहे. दारू अथवा तंबाखूचे नियमित सेवन करत असल्यास, कुटुंबात मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास, तोंडाचा कर्करोग असल्यास घरभेटीस येणाऱ्या पथकास निसंकोचपणे माहिती देण्याचे आवाहन या मोहिमेअंतर्गत करण्यात येत असल्याचे आरोग्यसेवक मंगला कणसे यांनी सांगितले.या अभियानाप्रसंगी सरपंच उषा रोकडे, अॅड. चंद्रसेन रोकडे, उपसरपंच पोपटराव दिवटे, माधव कर्पे, नितीन काजळे, कुंडलिक मुसळे, मुख्याध्यापक नंदकुमार बोराडे, केशव डोळस, पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे, रोहिदास सायखेडे, भास्कर काजळे, ज्ञानेश्वर यंदे, शरद काजळे, लखन मुसळे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.क्षयरोगाची लक्षणे -* दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला.* दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप.* वजनात घट.* भूक मंदावणे.* मानेवर गाठी येणे.कुष्ठरोगाची लक्षणे.* अंगावर फिकट लालसर चट्टा.* मऊ चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावर गाठी.* हातापायामध्ये बधिरता व शारिरिक विकृती.नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग प्रतिबंध जागरु कता अभियानाप्रसंगी मंगला कणसे, गणेश मुसळे, भास्कर काजळे, रोहिदास सायखेडे व इतर ग्रामस्थ.
कुष्ठरोग, क्षयरोग जागरूकता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 5:56 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक प्रतिबंध जागरु कता आणि रूग्णशोध अभियानास प्रारंभ झाला असून या मोहिमेत घरोघरी जाऊन रु ग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.
ठळक मुद्देनांदूरवैद्य येथे : घरोघरी जाऊन विविध रु ग्णांची तपासणी