महिला स्वावलंबनाचा त्यामागे हेतू आहे. महिंन्द्रा आणि महिन्द्रा पुरस्कृत व बायएफ सिन्नर संचालित प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत दोन दिवस मनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात खरीप हंगामासंदर्भात दोन दिवसांचे शेतीविषयक खरीप पूर्व मशागतीचे प्रशिक्षण देण्यात आले. खरीप हंगामासंदर्भात सोयाबीन व वटाणा या पिकांविषयी शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. त्यात शेतीची मशागत, बीज प्रक्रि या, लागवड पद्धती, आंतर मशागत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतात जावून महिलांना औजारांसह ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले. महिन्द्रा अँड महिन्द्राचे प्रकल्प प्रमुख राहुल शहा, पूणे येथील बाएफचे प्रशांत दुधाडे, सागर कडाव, रामप्रसाद, योगेश कानगुडे, सुजाता कानगुडे यांनी मार्गदर्शन केले. सिन्नरच्या बायफ प्रकल्प टीमने प्रशिक्षणाचे नियोजन केले होते. मनेगाव, आटकवडे, धोंडवीरनगर, पाटोळे, बारागावपिंप्री आणि देशवंडी येथील महिला बचत गटाच्या महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
ट्रॅक्टरच्या साहाय्याने महिलांना दिले मशागतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:31 PM