समर्थ मंगल कार्यालय येथे नाशिक जिल्हा व शहर महिला कुंभार समाज विकास समितीचा महिला मेळावा, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि महिलांसाठी विविध संधी विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रदेश महिला अध्यक्ष रसिका खेडेकर यांनी महिला सबलीकरण विषयावर मार्गदर्शन केले. महिलांसाठी विविध संधी विषयावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप मेनकर यांनी मार्गदर्शन केले. कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष नाना मंदिलकर, अनंत कुंभार, बाळासाहेब कुंभार, रमाकांत क्षीरसागर, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब जोर्वेकर, सुरेश बहाळकर, बापू गोरे, के. के. चव्हाण, अशोक जाधव, सुभाष कुंभार, प्रवीण जाधव, प्रिया झोरे, अक्षता सोनवळे, माधुरी दरेकर, भरत शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य माया दिनकर जोंधळे, मोनाली हरी जोंधळे, माया सोमनाथ जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्रमिला शिंदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक महिला अध्यक्ष सुवर्णा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सविता जगदाळे यांनी केले. वर्षा देवघडे यांनी आभार मानले. यावेळी शकुंतला जाधव, रंजना रसाळ, उषा चित्ते, अरुणा रसाळ, सुवर्णा चव्हाण आदींची उपस्थिती होती.
(फोटो १० कुंभार) महिला कुंभार समाज विकास समितीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करताना मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ.दिलीप मेनकर समवेत रसिका खेडेकर, सतीश दरेकर, नाना मंदिलकर, रमाकांत क्षीरसागर, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब जोर्वेकर, सुरेश बहाळकर, के. के. चव्हाण आदी.