शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मनेगाव येथे महिलांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत मशागतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:44 PM

सिन्नर : पुुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकाम करणाऱ्या बहुतेक महिला शेतकरी बैलजोडीची अवजारे शेतात चालवितात. मात्र, आधुनिक काळात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे.

सिन्नर : पुुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकाम करणाऱ्या बहुतेक महिला शेतकरी बैलजोडीची अवजारे शेतात चालवितात. मात्र, आधुनिक काळात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. महिलांनाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करता यावी, या उद्देशाने बायफ संस्थेने घेतलेल्या पेरणीपूर्व मशागत वर्गात बचत गटाच्या महिलांना ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले. महिला स्वावलंबनाचा त्यामागे हेतू आहे.महिंन्द्रा आणि महिन्द्रा पुरस्कृत व बायएफ सिन्नर संचालित प्रेरणा प्रकल्पा अंतर्गत दोन दिवस मनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात खरीप हंगामासंदर्भात दोन दिवसांचे शेतीविषयक खरीप पूर्व मशागतीचे प्रशिक्षण देण्यात आले. खरीप हंगामासंदर्भात सोयाबीन व वटाणा या पिकांविषयी सविस्तर शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. त्यात शेतीची मशागत, बीज प्रक्रि या, लागवड पद्धती, आंतर मशागत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतात जावून महिलांना औजारांसह ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून प्रात्याक्षिकही करून घेण्यात आले. महिन्द्रा अँड महिन्द्राचे प्रकल्प प्रमुख राहुल शहा, पूणे येथील बाएफचे प्रशांत दुधाडे, सागर कडाव, रामप्रसाद, योगेश कानगुडे, सुजाता कानगुडे यांनी मार्गदर्शन केले. सिन्नरच्या बायफ प्रकल्प टीमने प्रशिक्षणाचे नियोजन केले होते. मनेगाव, आटकवडे, धोंडवीरनगर, पाटोळे, बारागावपिंप्री आणि देशवंडी येथील महिला बचत गटाच्या महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

टॅग्स :Farmerशेतकरी