शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

तरुणांना पोलिसांकडून शिस्तीचे धडे

By admin | Published: February 17, 2016 11:53 PM

अंबड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पुढाकार

 सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सिडको, तसेच परिसरातील गुन्हेगारांना बोलावून त्यांना गुन्हेगारी व भाईगिरीपासून परावृत्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी गुन्हेगारीकडे झुकत चाललेले व काही अगोदरपासूनच गुरफटलेले अनेक तरुण गुन्हेगार बैठकीला उपस्थित होते.पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत सिडको, अंबड तसेच परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असलेल्या तरुणांना सहभागी करण्यात आले होते. यावेळी बर्डेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज तरुण वर्गाचे गुन्हेगारी व भाईगिरीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु त्यांना आपण चुकीच्या मार्गाकडे वाहून जात असल्याची जाणीव होत नसल्याने त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. स्वत:ला भाई समजणारे अट्टल गुन्हेगार हे तरुणांना यात सहभागी करून घेतात व त्यांच्या आयुष्याचे नुकसान करीत असतात. तरी तरुणांनी भाईगिरीचा मोह सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज असल्याचे बर्डेकर यांनी सांगितले. गुन्हेगारी व भाईगिरीत अडकल्याने काही दिवसांतच त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. तसेच समाजात गुंडगिरीचा शिक्का बसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलतो. तसेच एकदा गुन्हेगारीचा शिक्का बसला की चांगली नोकरीदेखील मिळत नाही. यासाठी तरुणांनी या भाईगिरीकडे न वळता समाजाच्या प्रवाहात यावे. तसेच क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी बर्डेकर यांनी केले. या बैठकीला टिप्पर गॅँग, राकेश कोष्टी गॅँग, प्रणय बोरसे गॅँग यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकत चाललेले तरुण यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)अंबड पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीप्रसंगी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असलेल्या तरुणांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर.