सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने येथील सिन्नर महाविद्यालयात युवकांसाठी पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाले.पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्यावतीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली येथील महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा पार पडली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. सोनखासकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणजीत आंधळे, संगिता गिरी, उपप्राचार्य आर. व्ही. पवार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील तरूणवर्ग हा नागरी तथा संरक्षण क्षेत्रातील भरतीप्रक्रियेत सातत्याने अगे्रसर असतो. हे उध्दीष्ट्य समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करताना अभ्यास आणि सराव यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेद्वारे घेण्यात येण्याऱ्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रीत करून त्याच्या पुर्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चीतच लाभदायक ठरेल असे मत प्राचार्य खोनखासकर यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून महाविद्यालयात पोलीस भरती प्रक्रिया सराववर्ग घेण्यात येणार आहे. यावेळी सिन्नर पोलीस ठाण्याचे नितीन गाढवे, उल्हास धोंडगे, प्रा. यु. ए. पठाडे आदिंसह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.