देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्योगाचे धडे देण्याचा उपक्र म सुरू केला आहे.सुजाता कोकण कृषी विद्यापीठात बीएससी अॅग्री चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. ती गावातील महिलांना गृहउद्योगाचे धडे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची ती माहिती देत आहे.परिसरातील महिलांना आंब्यापासून जाम, आंबा पोळी, आमचूर, सिरप, स्क्वॅश, लोणचे या सारखे विविध पदार्थ तयार करणे, पनीर तयार करणे, आदी विविध गोष्टी अंतिम वर्षाच्या प्रकल्पांतर्गत शिकवत आहे. तिच्या या प्रकल्पामुळे शेतीपुरक गृहउद्योगांची माहिती महिलांना मिळत आहे. तसेच माती परिक्षणाचे महत्व, पद्धती, फायदे यांची माहिती शेतकºयांना देत आहे.ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव हा कृषी पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षामध्ये सादर केला जातो, कृषी विद्यार्थ्यांना खेड्यातील परिस्थिती, शेतातल्या कुटूंबीयांसमवेत काम, त्यांच्या अडचणी ओळखण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी, त्यांचे रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यानुभव आवश्यक असतो. कृषी क्षेत्रातील उद्योजकता वाढवणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. या गोष्टी कोरोना लॉक डावुनच्या कारणास्तव फक्त कागदावर राहू नये म्हणून व आपल्या परिसरातील महिलांच्या हाताला भविष्यात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मी हे प्रशिक्षण सुरू केलं आहे.- सुजाता प्रकाश पवार, भऊर.भऊर येथे शेतकर्यांना पीकांतील नवीन तंत्रज्ञाना बद्दल माहीती देतांना सुजाता पवार.
महिलांच्या ग्रुहउद्योगांबरोबर मातीपरिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 2:52 PM
देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्योगाचे धडे देण्याचा उपक्र म सुरू केला आहे.
ठळक मुद्देदेवळा : आत्मनिर्भरासाठी कृषि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थीनीची धडपड !