नाशिक : शासकीय नियमाप्रमाणे शुल्क घेण्याचा आदेश असआप कार्यकर्ते आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना घेराव घालण्यात आला. शिक्षण संस्थांकडून तानाही कनिष्ठ महाविद्यालयांकडून उकळण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शुल्कांवर नियंत्रण नसल्याचा आरोप करीत, खुलेआम होणारी लूट थांबविण्याचे सोडून उपसंचालक विद्यार्थ्यांची लूट मुकाटपणे पाहत असल्याचा आरोप करीत, आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजीत उपसंचालकांना चांगलेच धारेवर धरले. दरवर्षी उपसंचालक कार्यालयाकडून अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेपूर्वी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना सूचना केल्या जातात. त्या संदर्भात गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करीत असतानाच आपचे कार्यकर्ते आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनांनी व्यासपीठावर चढून सूर्यवंशी यांना घेराव घातला. उपसंचालक सूर्यवंशी आपल्या कार्यालयात भेटत नसल्याने या आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच त्यांना गाठण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच सूर्यवंशी यांना गाठले. दरवर्षी उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेशासंदर्भात शासकीय आदेशाचे पालन करण्याचेही सांगितले जाते; प्रत्यक्षात अशा बैठकांनंतरही संबंधित संस्थाचालक शुल्कापोटी खोऱ्याने पैसा ओढत असतानाही उपसंचालक मात्र कारवाई करीत नाहीत. असे होणार असेल तर मग बैठका कशासाठी, असा संतप्त सवाल या आंदोलनकर्त्यांनी केला. मुलींना मोफत शिक्षण, मुलांना दहावीपर्यंतचे मोफत शिक्षण, शासकीय शुल्क याबाबतची सर्व माहिती महाविद्यालयांच्या दर्शनी भागावर लावण्यात यावी असे आदेश आहेत; मात्र त्याकडे उपसंचालक दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लागलीच मुख्याध्यापकांना फलक लावण्याचे तोंडी आदेश दिले. शासनाच्या आदेशानुसार शुल्क घेण्यात यावे, जादा शुल्क घेतले असेल तर ते परत करावे, मुलींकडून शुल्क घेऊ नये, माहितीपत्रकाची किंमत फक्त १० रुपये असावी असे सर्व नियम दरवर्षी महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दिले जातात. यासंदर्भात स्वत: उपसंचालक मुख्याध्यापकांना दरवर्षी सूचना देतात; मात्र पालक किंवा विद्यार्थ्यांनी तक्रार केली तर उपसंचालक पालकांनाच धारेवर धरत असल्याच्या आरोप आपने केला आहे; तर संस्थाचालक मनमानी करीत असतील तर दरवर्षी मार्गदर्शन बैठक घेऊन दिखाऊपणा करू नये, अशी भूमिका घेत छात्रभारती आणि आपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांवर प्रश्नांचा भडिमार केला. (प्रतिनिधी)
उपसंचालकांनाच शिकविला धडा
By admin | Published: June 14, 2014 1:48 AM