नाशिक : देशात मुस्लिमांचा प्रभाव वाढला असून, हिंदूंची एकता नसल्याने अखंड भारत विखुरला आहे. जम्मू-काश्मीर या राज्यामधून तर केव्हाच हिंदूंना बाहेर काढले असून, पूर्वेत्तर राज्यांमध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात कोणीही बोलण्यास तयार नसल्याने हा देश खरच धर्मनिरपेक्ष आहे काय? असा प्रश्न पडतो. धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले.भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदूत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, इस्लामिक मानसिकता जिहादची असून, मनुष्य संपविण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे देशाच्या शालिनतेसाठी राष्ट्रवादाचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी हिंदूत्त्वाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. वास्तविक देशात समान कायदा असता तर अल्पसंख्याक आणि इतर वर्ग असा कधीही भेदभाव झाला नसता. थोडक्यात हिंदूकरण झाल्याशिवाय रामराज्य येणार नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाना साधत त्यांच्या आगतिक राजकारणामुळेच भारताची दैना झाल्याचेही सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री मनोज जोशी, अपर्णा रामतीर्थकर, मृणाल बोडके, अमोल वडनेरे, माधव राठी, एकनाथ शेटे, गणेश सपकाळ आदि उपस्थित होते.
धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हावे
By admin | Published: May 29, 2015 12:04 AM