नाशिक : पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे. तसेच जुन्या वृक्ष संरक्षकांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी २६ लाख ४० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. अशाप्रकारे वृक्षलागवडीपोटी ६६ लाख रुपये हे संरक्षक जाळ्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.येत्या महासभेवर संरक्षक जाळ्या खरेदी व दुरुस्तीसंदर्भातील दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. यातील नवीन वृक्ष सरंक्षक खरेदीच्या प्रस्तावात ३९ लाख ९९ हजार ४२५ रुपये खर्चाचे १,८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्यात येणार आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात महापालिकाही सहभागी होणार असून, मनपा हद्दीत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना या वृक्षांचे संगोपन व जपणूक करण्यासाठी संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) खरेदी उद्यान विभागाने प्रस्तावित केली आहे. त्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आले असून, नवीन जाळ्यांची खरेदी व जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांत महापालिकेकडून दहा ते बारा फूट उंचीची झाडांची लागवडीचे काम काही संस्थांना दिले होते. त्यांच्याकडून झाडाच्या चार बाजूंना बांबू व हिरवे कापड लावण्याचे काम झाले होते. परिणामी हे बांबू तुटले आणि कापड गायब झाल्याने काही झाडे नष्ट झाल्याचा आरोप स्थायी समितीत सदस्यांकडून करण्यात आला होता. यामुळे आता नवीन वृक्षलागवड करताना सर्वच झाडांंना सरंक्षक जाळ्या लावण्याची मागणी करण्यात आली होती.
महापालिकेचे झाडे लावण्यासाठी होऊ द्या खर्च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:18 AM
पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे.
ठळक मुद्देखरेदी करणार ट्री गार्ड : ६६ लाखांचा प्रस्ताव महासभेवर