येवला : येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय आणि जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. यानिमित्त शहरात जनजागृती करीत तीन हजार घरांच्या दारावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, आरोग्य आणि शिक्षण सभापती सुरेखा दराडे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, सहायक उपसंचालक पुष्पा पाटील, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, सरचिटणीस सुशील गुजराथी, उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल, संचालक रोशन भंडारी, धनंजय कुलकर्णी, किशोर सोनवणे, जयंत पेटकर, मुक्तानंद विद्यालयाचे प्राचार्य दत्ता नागडेकर, जनता विद्यालयाचे प्राचार्य सुभाष निकम, उपप्राचार्य नानासाहेब पटाईत, एन्झोकेम विद्यालयाचे प्राचार्य दत्ता महाले, उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक कैलास धनवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी म्हणाल्या की, आत्मविश्वास असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मुलींनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला पाहिजे, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. ज्ञानेश्वर पायमोडे यांनी या उपक्र माची सुरुवात कशी केली याबाबतची माहिती मनोहर वाघमारे यांनी प्रास्ताविकात दिली. रामेश्वरी शिंदे व सहकाऱ्यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.याप्रसंगी वनिता वाघ दिग्दर्शित पथनाट्य प्रणाली वाघ, जान्हवी विटनोर, रसिका चव्हाण, प्रियंका जाधव, आयुष मापारी, पार्थ खराडे, अक्षय खोडके, जीवन मढवई, पार्थ ठाकरे, आकाश बिलवरे यांनी सादर केले. तर रसिका चव्हाण हिने मी सावित्री बोलतेय हे एकपात्री नाटक सादर केले. यावर कोमल पवार हिने मनोगत व्यक्त केले. तर सुहासिनी चित्ते यांनी हुंडाबंदीची शपथ दिली. दत्तकुमार उटावळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले. विस्ताराधिकारी पाटोळे, रमेश गायकवाड, वंदना चव्हाण, सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख रमेश खैरनार आदी कार्यक्रमास उपस्थित होते.वृक्षदिंडीने वेधले लक्षतेजल सोनवणे, कृतिका देहाडे, प्रांजल कहार, रितू व्यवहारे, प्रेरणा काटेदाते या मुलींनी पालखीचे भोई होत ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढली. सर्व विद्यार्थिनींची शहरातून वाजतगाजत फेरी काढण्यात येऊन तृप्ती लाडे, संस्कृती गायकवाड, प्राची सोनवणे, दर्शना त्रिभुवन यांच्यासह तीन हजार मुलींच्या दारावर त्यांच्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या. तसेच जिजाऊंच्या वेशभूषेत भाग्यश्री टोणपे, राणी लक्ष्मीबार्इंच्या वेशभूषेत वेदिका राजपूत, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत असलेल्या स्वीटी झोंड यांनी अश्वावरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
उमलू द्या हो कोवळ्या कळ्यांना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:17 PM
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय आणि जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. यानिमित्त शहरात जनजागृती करीत तीन हजार घरांच्या दारावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या.
ठळक मुद्देकरूया सन्मान लेकीचा । येवल्यात तीन हजार दारांवर मुलींच्या नावाच्या पाट्या